Dada Bhagwan
आप्तवाणी - ६ (Marathi)
आप्तवाणी - ६ (Marathi)
Couldn't load pickup availability
एकीकडे संसार व्यवहारात पदोपदी येणाऱ्या समस्या आणि दुसरीकडे आंतरिक संघर्षांशी झुंजणाऱ्या या काळाच्या मनुष्याला अंतरशांती कशी काय लाभेल? यातून सुटका कशी होईल? आपण पाहतो की कित्येकदा आपल्या बोलल्यामुळे समोरच्याला दुःख होत असते, तर कित्येकदा कोणी आपल्याला काही बोलले त्यामुळे आपल्याला दुःख होते, कधी वाटते आपल्याबरोबर अन्याय झाला आहे, तर कधी मनात शंका वाटत राहते, इतरांना दोषी पाहिले जाते... अशा परिस्थितीत समाधान कसे मिळवायचे? जीवन व्यवहार हे समस्यांचे संग्रहस्थानच आहे. एका समस्येचे निवारण झाले की दुसरी समस्या आ वासून उभीच असते. आपल्याला सतत अशा समस्यांचा सामना का करावा लागतो? स्वतःच्या कोणत्या चुकीमुळे आपण अनंतकाळापासून भटकत राहिलो आहोत? वास्तवात स्वतःजवळ आत्म्याचा परमानंद तर होताच पण स्वतः दैहिक सुखातच रममाण होता. ज्ञानी पुरुषांच्या कृपेमुळे आणि त्यानंतर स्व-पराक्रमाने ही चूक सुधारता येते. एकदा आत्मज्ञान झाले की अनंत समाधीसुख अनुभवास येते! तर चला, या अक्रम विज्ञानाद्वारे कर्म, बंधन, प्रतिक्रमण, वाणी, निसर्गाचे नियम... इत्यादीचे विज्ञान समजून घेऊया आणि त्या समजूतीने सांसारिक समस्यांना अगदी सहजपणे सोडवून परमानंद प्राप्तीकडे वळूया.
