Dada Bhagwan
अहिंसा (Marathi)
अहिंसा (Marathi)
Regular price
Rs. 35.00
Regular price
Sale price
Rs. 35.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
या छोट्या छोट्या जीवांना मारणे यास द्रव्यहिंसा म्हटली जाते आणि कोणाला मानसिक त्रास देणे, कोणावर क्रोध करणे, रागावणे, ही सर्व भावहिंसा म्हटली जाते. लोकांनी जरी कितीही अहिंसा पाळली तरी पण अहिंसा पाळणे हे इतके सोपे तर नाहीच. आणि वास्तवात क्रोध-मान-माया-लोभ हीच हिंसा आहे. द्रव्यहिंसा निर्सगानुसार चालतच राहते. यात तर कुणाचे काही चालतच नाही. म्हणूनच देवाने काय सांगितले की सर्वात प्रथम स्वत:ला कषाय होणार नाहीत, असे करा.कारण कषाय म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ हीच सर्वात मोठी हिंसा आहे. द्रव्यहिंसा झाली तर भले झाली पण भावहिंसा होता कामा नये. परंतु लोक तर द्रव्यहिंसा थांबवतात आणि भावहिंसा तर होतच राहते. म्हणून जर कोणी असा निश्चय केला असेल की च्मला मारायचे नाहीचज् तर त्याच्या वाट्याला कोणी मरायला येतही नाही.ज् आणि तसे पाहिले तर त्याने स्थूलहिंसा बंद केली, की मला कोणत्याही जीवाला मारायचेच नाही पण मग बुद्धीने मारण्याचे ठरवले तरी त्याचा बाजार उघडाच राहतो. अहिंसेच्या बाबतीत या काळाचे ज्ञानी-परमपूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेली वाणी या पुस्तकात संकलित करण्यात आलेली आहे. यात हिंसा आणि अहिंसा, याचे सर्व रहस्य उलघडण्यात आले आहे.
