Dada Bhagwan
आप्तवाणी-४ (Marathi)
आप्तवाणी-४ (Marathi)
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
तुम्ही स्वतः जे आहात त्यात इतकी क्षमता आहे की ते संपूर्ण जग प्रकाशित करू शकते. स्वतःमध्ये अनंत शक्ती असूनही आपण खूप दुःख, कष्ट, लाचारी आणि असुरक्षिततेचा अनुभव करतो. हे किती विरोधाभासी आहे! आपल्याला स्वतःच्या, स्वरूपाच्या शक्तीचे आणि सत्तेचे खरे ज्ञानच नाही. जेव्हा आपण स्वतः जागृत होतो तेव्हा आपण सर्व सृष्टीचे मालक आहोत असे अनुभवास येते. साधरणपणे ज्याला जागेपण म्हटले जाते त्याला ज्ञानी निंद्रा म्हणतात. संपूर्ण विश्व भावनिद्रेतच आहे. जागृती किंवा योग्य समज नसल्यामुळे आपल्याला हे कळतच नाही की या जगात आणि दुसऱ्या जगात आपल्यासाठी काय लाभदायक आहे व काय हानीकारक आहे. सध्या भावनिद्रेमुळे अहंकार, मान, क्रोध, छल-कपट लोभ व वेगवेगळ्या मान्यता आणि चिंतेमुळे सगळ्यांना मतभेद जाणवत असतात. परंतु ज्याला अशी जागरुकता आहे की, ‘मी जागृत आहे’, आणि मनाचे विचार ‘स्व’पासून पूर्णतः वेगळे आहेत, ज्याला आत्म्याच्या विज्ञानाची अनुभूती झाली आहे, तो संसारात राहूनही जीवनमुक्त होऊन जातो. या पुस्तकात ज्ञानी पुरुष परम पूज्य दादाश्रींनी आपण स्वतःच्या प्रती कसे जागृत राहावे, ध्यान, प्रारब्ध आणि स्वतंत्र इच्छा, घृणा-तिरस्कार, अनादर, स्वतःच्या सांसारिक धर्म, जीवनमुक्तीचे लक्ष्य आणि कर्माचे विज्ञान इत्यादी सर्व बाबतींचे ज्ञान दिले आहे. जे लोक स्वतःचा खरा अर्थ जाणण्यास उत्सुक आहेत त्यांना हे पुस्तक वाचल्याने मुक्तीपंथावर पुढे जाण्यास मदत मिळेल आणि या पुस्तकाचे वाचन त्यांची जागृती वाढवेल.
